आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवडिलांच्या लग्नाविनाच झाला जस्टिन बिबरचा जन्म, वाचा या पॉप स्टारच्या रंजक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बेबी…बेबी…' हे गाणं जर कोणी ऐकलं-पाहिलं असेल, तर त्याला जस्टिन बिबर कोण हे सांगण्याची गरज नाही. हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉप गायक सध्या भारत दौ-यावर असून 10 मे रोजी मुंबईत त्याची लाइव्ह कॉन्सर्ट रंगणारेय. नवी मुंबईतील होणा-या या लाइव्ह कॉन्सर्टसाठी सध्या सर्वजण उत्सुक आहे. त्याच्या या कॉन्सर्टसाठी जंगी तयारी करण्यात आली आहे.
 
जस्टिनच्या खास मागण्यादेखील पूर्ण झाल्या आहेत. या कार्यक्रमासाठी कमीत कमी 5 हजार रुपये तिकीट आहे, तर प्लॅटिनम तिकीट 15 हजार 400 रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. जस्टिनच्या सुरक्षेसाठी अभिनेता सलमान खानने त्याचा पर्सनल बॉडीगार्ड शेराची नियुक्ती केली आहे. निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करनच्या नव्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये जस्टिन सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.  या भारत दौऱ्यामध्ये पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणे सर्व काही सुरळीत पार पडले तर, करण या ग्लोबल स्टारच्या खास उपस्थितीत त्याच्या गाजलेल्या कार्यक्रमाच्या म्हणजेच ‘कॉफी विथ करण’च्या सहाव्या पर्वाची सुरुवात करणार आहे.
 
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय पॉप गायकाविषयी जाणून घेऊयात बरंच काही...
 
कोण आहे जस्टिन बिबर?

जस्टिन बिबर हा जगभरात गाजलेला पॉप गायक आहे. जस्टिन ड्रियु बिबर हे त्याचे पूर्ण नाव आहे. 1 मार्च 1994 रोजी कॅनडात त्याचा जन्म झाला. 23 वर्षीय जस्टिन गायक, गीतकार आणि अभिनेता आहे. 
 
पुढे वाचा, जस्टिनच्या आईवडिलांचे लग्न झाले नसून सिंगल मदर आहे जस्टिनची आई, आणि बरंच काही....  
बातम्या आणखी आहेत...