आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Iranian Actress Leila Hatami Faces Public Flogging For Kiss

Cannesमध्ये इराणी अभिनेत्रीच्या चुंबनावर वाद, चाबकाचे 50 फटके मारण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये इराणी अभिनेत्री लैला हातमी यांनी कान फिल्म फेस्टिव्हलचे अध्यक्ष जाइल्स जॅकेब यांच्या गालावर केलेल्या चुंबनामुळे चांगला वाद निर्माण झाला आहे. यामुळे अभिनेत्री लैला यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे. धार्मिक भावना दुखावल्यामुळे आता त्यांना सार्वजनिकरित्या चाबकाचे फटके मारण्याची मागणी केली जात आहे. इरानच्या रिव्हॉल्यूशनरी गार्डशी संबंधित हिज्बुला समुहातील विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे. यापूर्वी इराणमधील वरिष्ठ अधिका-यांनी हातमी यांच्यावर टीका केली होती. हातमी यांच्या अशा वागण्यामुळे इराणी महिलांची प्रतिमा मलिन झाल्याचे म्हटले जात आहे.
चाबकांचे 50 फटके मारण्याची मागणी
इराणमधील तसनिम या न्यूज वेबसाइटने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, हिज्बुला स्टुडंट्स ऑर्गनायजेशनने हातमी प्रकरणाला न्यायालयात खेचले आहे. हातमी यांना शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या ऑर्गनाइजेशनने हातमी यांना चाबकाचे 50 फटके मारण्याची मागणी केली आहे. इराणी शरिया कायद्यानुसार, एखादी स्त्री आपल्या कुटुंबातील पुरुषाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पुरुषाच्या शरीराला स्पर्श करु शकत नाही.
पुढे वाचा संपूर्ण प्रकरण आणि बघा अभिनेत्री लैलाची छायाचित्रे...