आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘ज्युरासिक पार्क’ श्रृंखलेचा आणखी एक नवा चित्रपट ‘जुरासिक वर्ल्ड’ नावाने येत आहे. यात मुख्य भूमिकेत क्रिस पॅट दिसणार आहेत. ते गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी, मनीबॉल, पार्क्स अँड रीक्रिएशनसाठी प्रसिद्ध आहेत. तर दुसर्या भूमिकेसाठी इरफान खानच्या नावावर विचार सुरू आहे. स्टीवन स्पीलबर्गची निर्मिती असलेला हा चित्रपट 12 जून 2015 ला प्रदर्शित होणार आहे. इरफान पहिल्यांदाच आसिफ कपाडियाच्या प्रशंसनीय ‘द वॉरियर’ मध्ये झळकला होता. त्यानंतर त्याने मीरा नायरचा ‘द नेमसेक’, मायकल विंटरबॉटम यांचा ‘अ मायटी हार्ट’, डॅनी बोयेल यांचा ‘स्लमडॉग मिलिनीयर’ केला. शिवाय ‘द अमेझिंग स्पायडरमॅन’ आणि ‘लाइफ ऑफ पाय’साठी त्याचे कौतुकही झाले आहे. टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी ब्रिलस्टीन एंटरटेनमेंट पार्टनर्स हॉलीवूडमध्ये त्याचे प्रतिनिधित्व करत असते. हा चित्रपट इरफानला मिळाला तर त्याच्या करिअरसाठी हा मैलाचा दगड ठरेल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.