आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे. के. रोलिंग यांनी सांगितला 'क्विडिच वर्ल्ड कप'चा इतिहास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॅरी पॉटरची लेखिका जे.के. रोलिंग यांनी अलीकडेच क्विडिच वर्ल्ड कप या आपल्या फिक्शनल गेमविषयी सांगितले. पोंरट मोर डॉट कॉम या आपल्या वेबासाईटवर 2400 शब्दांत या गेमच्या इतिहासाविषयी रोलिंग यांनी लिहिले आहे. हा गेम हॅरी पॉटर या कादंबरीचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे.

रंजक पद्धधतीने रोलिंग यांनी या गेमचा इतिहास लिहिला आहे. या खेळाविषयी मनात कसा विचार आला आणि नंतर तो प्रत्यक्षात कसा उतरवला, याचे सविस्तर वर्णन त्यांनी या लेखात केले आहे.

या लेखाचा पुढील भाग शुक्रवारी पोस्ट करण्यात येणार आहे. 1994पासून ते आजवरच्या टुर्नामेंट्सविषयी त्या सांगणार आहेत. पॉटर मोर डॉट कॉमचे सीईओ सुसेन जोओरविक्स म्हणतात, की जगाला या काल्पनिक आणि इंट्रेस्टिंग स्टोरीविषयी सांगताना आम्हाला खूप आनंद होतोय. रोलिंगच्या चाहत्यांसाठी एक डिजिटल प्लॅटरफॉर्म उपलब्ध करुन देणे, हा त्यामागचा हेतू आहे.