आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर विजेती जेनिफर लॉरेन्सला करायचा आहे आराम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार आपल्या नावी करणारी अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स सध्या खूपच आनंदात आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर आता ती या विजयाचा आनंद आराम करुन साजरा करत आहे.
लॉरेन्सने सांगितले की, ''आता मला फक्त माझा सोफा, टीव्ही आणि वाईनची बाटली दिसत आहे. मला काही दिवस आराम करण्यात घालवायचे आहेत.''
विशेष म्हणजे लॉरेन्सला बाहेर पार्टी करायला आवडत नाही. तिला जास्तीत जास्त वेळ घरात घालवायला आवडतो.
ती म्हणते की, ''मला बाहेर राहणे जास्त आवडत नाही. बाहेर निघताच मला आपल्या घराची आठवण येते.''