आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jim Carreys Girlfriend Found Dead In Apparent Suicide

ब्रेकअपच्या 5 दिवसांत हॉलिवूड स्टार जिम कॅरीच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटसोबत हॉलिवूड अभिनेता जिम कॅरी. - Divya Marathi
गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटसोबत हॉलिवूड अभिनेता जिम कॅरी.


लॉस एंजिलिसः हॉलिवूड अभिनेता जिम कॅरीच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी जिमची 30 वर्षीय गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. मृतदेहाच्या शेजारी भरपूर औषधे सापडली आहेत. औषधांच्या ओव्हरडोजमुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी रात्री तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता आहे. अद्याप पोलिसांनी कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. मृत्यूपूर्वी कॅथरिओनाने सुसाइड नोट लिहिली आहे. यामध्ये तिने म्हटले, की 24 सप्टेंबरला दुस-यांदा तिचे ब्रेकअप झाले होते.
सोशल मीडियातून बाहेर पडली होती कॅथरिओना...
कॅथरिओना मेकअप आर्टिस्ट होती. सेलिब्रिटींविषयीच्या बातम्या देणारी वेबसाइट TMZ.comच्या मते, कॅथरिओना आणि 53 वर्षीय कॅरीची भेट तीन वर्षांपूर्वी झाली होती. दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चालले होते. मात्र गेल्या आठवड्यात हे दोघे विभक्त झाल्याची बातमी आली. कॅथरिओनाने 24 सप्टेंबरला ट्विट केले होते, ती ट्विटरवरुन बाहेर पडत आहे. तिने लिहिले होते, ट्विटरवरुन मी बाहेर पडत आहे. आशा आहे, की तुमचे प्रेम असेच सदैव मला मिळत राहिल. 2009 मध्ये कॅथरिओना आयरलंडहून कॅलिफोर्नियात स्थायिक झाली होती.
काय म्हटले जिम कॅरीने?
गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर जिम कॅरीने म्हटले, स्वीट कॅथरिओनाच्या निधनाने मला मोठा धक्का बसला आहे. मी खूप दुःखी झालोय. ती खूप चांगल्या मनाची नाजूक इरिश फ्लॉवर होती. तिचे प्रेम मिळणे हा सुखद अनुभव होता. तिच्या कुटुंबीयांचे मी सांत्वन करतो.
कोण आहे जिम कॅरी?
जिम कॅरी हॉलिवूडच्या प्रसिद्ध कॉमेडिअन्सपैकी एक आहे. डंब अँड डंबर, ब्रूस एल्माइटी, मॉस्क हे सिनेमे खूप गाजले आहेत. 2पाच वर्षांच्या लग्नानंतर 2010 मध्ये जिमने पत्नी जेनी मॅकर्थीसोबत घटस्फोट घेतला होता.
पुढे पाहा, संबंधित छायाचित्रे...