आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pirates Of The Caribbean Fame Johnny Depp And Amber Heard Get Married In Los Angeles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पायरेट्स...' फेम जॉनी डेप अडकला लग्नगाठीत, गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - 'पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन'च्या एका दृश्यात जॉनी डेप, उजवीकडे- अँबर हर्डसोबत जॉनी डेप)

लॉस एंजिलिसः हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि 'पायरेट्स ऑफ द कॅरेबिअन' फेम जॉनी डेप नुकताच लग्नगाठीत अडकला. जॉनीने त्याची गर्लफ्रेंड अँबर हर्डसोबत गुपचूप लग्न थाटले. विशेष म्हणजे हा लग्नसोहळा बहामाच्या एका बेटावर पार पडला. आपल्या लग्नाला फार थोड्या लोकांना बोलवायचे त्याने ठरवले होते. त्यामुळे या लग्नात जॉनी आणि अँबरच्या कुटुंबीयांसह अगदी जवळचे मित्र उपस्थित होते.
जॉनी आणि अँबर यांनी त्यांचा लग्नसमारंभ अगदी खासगी ठेवला. गेल्या तीन वर्षांपासून जॉनी आणि अँबर रिलेशनशिपमध्ये आहेत. 51 वर्षीय जॉनी आणि 28 वर्षीय अँबरची पहिली भेट द रम डायरी (2011) या सिनेमाच्या सेटवर झाली होती. 2012मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.
अँबर हर्ड जॉनीच्या आयुष्यात येण्यापूर्वी तो वॅनेसा पॅरडाइससोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांची दोन मुलेसुद्धा आहेत. तब्बल 14 वर्षे हे दोघे एकत्र होते. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर अँबरची एन्ट्री जॉनीच्या आयुष्यात झाली आणि ते अखेर लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अँबर हर्डसोबतची जॉनी डेपची निवडक छायाचित्रे...