आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युरासिक पार्क-4 होणार ‘ज्युरासिक वर्ल्ड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - पृथ्वीवरील प्राचीन अजस्र प्राण्याचे अस्तित्व आणि इतिहास मांडणारा ज्युरासिक
पार्कचा चौथा भाग 2015 मध्ये येऊ घातला आहे. हा सिक्वेल ‘ज्युरासिक वर्ल्ड’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


डायनासोरची थरारक कथा नव्या सिक्वेलमध्येदेखील आहे. या सिक्वेलची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. त्याचे दिग्दर्शन कॉलीन ट्रेव्होरॉ करणार आहेत. डेरेक कॉनॉली यांनी त्याची पटकथा लिहिली आहे. ज्युरासिक वर्ल्डचे प्रदर्शन जून 2014 मध्ये ठरले होते; परंतु ते एक वर्ष लांबणीवर पडले आहे. जून 2015 मध्ये त्याचे प्रदर्शन होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा मूळ ज्युरासिक पार्क 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. 1997 मध्ये त्याचा सिक्वेल आला होता. 2001 मध्ये तिसरा सिक्वेल आला होता.