आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Jurassic World' Becomes Third Highest Grossing Film Ever

सर्वाधिक कमाई करणारा जगातील तिसरा सिनेमा ठरला 'ज्युरासिक वर्ल्ड'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः क्रिस पॅट, ब्राइस डालास हॉवर्ड आणि इरफान खान स्टारर 'ज्युरासिक वर्ल्ड' हा सिनेमा जगभरात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. सिनेमाने वर्ल्डवाइड 1.52 अब्ज डॉलर हून अधिकची कमाई करुन सिनेसृष्टीच्या इतिहासात तिस-या क्रमांचा सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावी केला आहे.
जगभरात सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमात पहिला क्रमांक लागतो तो जेम्स कॅमेरन यांच्या 'अवतार' या सिनेमाचा. 'अवतार'ने जगभरात 2.79 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. तर दुस-या क्रमांवर 'टायटॅनिक' हा सिनेमा असून त्याने 2.18 अब्ज डॉलरचा गल्ला जमवला आहे.
वेरायटी डॉट कॉम या वेबसाइटच्या मते, 'ज्युरासिक वर्ल्ड' या सिनेमाने 'द एवेंजर्स' या सिनेमाला मागे टाकत तिसरा सर्वाधिक कमाई करणा-या सिनेमाचा मान पटकावला आहे.
दिग्दर्शक कॉलिन ट्रेवोरोच्या 'ज्युरासिक वर्ल्ड' हा सिनेमा 'ज्युरासिक वर्ल्ड' या हॉलिवूड सिनेमाच्या सीरिजचा चौथा भाग आहे. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता निर्माते या सिनेमाच्या सिक्वेलवर काम करत असून 'ज्युरासिक पार्क' या नावाने या सीरिजचा पाचवा सिनेमा लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येणारेय.