आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर व्हायरल होताहेत दोन मुलांच्या आईचे फोटोज, जाणून घ्या काय आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोरंटोः कॅनडिअन ब्लॉगर कॅमिला उस्मान सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. यावेळी ती तिच्या एखाद्या ब्लॉगमुळे नव्हे तर तिच्या इन्स्टाग्राम फोटोजमुळे चर्चेत आहे. कॅमिलाने इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजमधील तिचा लूक हुबेहुब रिअॅलिटी स्टार आणि सुपर मॉडेल किम कार्दशियनसारखा दिसतोय. हुबेहुब किमसारखी दिसत असल्याने तिला तिची जुळी बहीण म्हटले जात आहे. कॅमिलाची फिजिक, फेस आणि स्टाइल अगदी किमप्रमाणेच आहेत. नेहमी शेअर करत असते किमसारखे फोटोज...

कॅमिला तिच्या इन्स्टाग्रामवर नेहमी किमच्या स्टाइलमधील फोटोज शेअर करत असते. अलीकडेच रिअॅलिटी शो ‘कीपिंग विद कार्दशियन’ मध्ये किमचा एक फ्रेंड जोनाथन चेबनने तिची भेट कॅमिलासोबत घालून दिली होती. कॅमिलाला बघून किमला आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी किमने कॅमिलासोबत काही फोटोजही काढून घेतले होते.

दोन मुलांची आई आहे कॅमिला
36 वर्षीय कॅमिला कॅनाडातील प्रसिद्ध फॅशन ब्लॉगर आहे. तिच्या फॉलोअरची संख्या चार लाखांच्या घरात आहे. यावरुन तिच्या प्रसिद्धीचा अंदाज बांधता येतो. कॅमिला किमच्या स्टाइलमधील फोटोज शेअर करत असली, तरी यावर मी किमची कॉपी करत नाही, असे ती म्हणते. कॅमिला परफेक्ट फिगरचे श्रेय तिच्या पर्सनल ट्रेनरला देते. जो तिच्या फिटनेससोबत तिच्या हेल्दी डाएटकडेही लक्ष देतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, किमप्रमाणे हुबेहुब दिसणा-या कॅमिलाचे खास PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...