आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवेने दु:खी आहे केट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या विषयी उडालेल्या अफवेमुळे सुपर मॉडेल आणि हॉलीवूड अभिनेत्री केट मॉस दु:खी आहे. केट अँनोरेक्सिया आजाराने ग्रासित असल्याची अफवा हॉलिवूड माध्यमांत पसरली आहे. या आजारात भूक लागत नाही. तथापि 39 वर्षीय मॉडेल आणि एका मुलाची आई केट म्हणते की, या बातमीचे मलाही नवल वाटत आहे. सडपातळ राहण्यासाठी मी कधीच उपाशी राहत नाही. त्यामुळे ही बातमी खोटी असल्याचे ती म्हणाली. एक अभिनेत्री म्हणून सुडौल राहण्यासाठी मी व्यायाम करते. मात्र, उपाशी राहत नाही. तरुणांनादेखील मी हेच सांगेल की सुडौल राहण्यासाठी व्यायाम करा मात्र जेवण भरपूर करा.