आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी केटने वेबसाइटला दिली खटला दाखल करण्याची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल केट अपटन एका वेबसाइटमुळे त्रस्त झाली आहे. कारण ही वेबसाइट तिची खासगी छायाचित्रे पोस्ट करत आहेत. अपटनने वेबसाइटवर खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 'टीएमजेड डॉट कॉम' वेबसाइटनुसार, 'सेलेब जिहाद' नावाच्या या विनोदांच्या वेबसाइटने तिची स्विमसुटमधील छायाचित्रांमध्ये फोटोशॉपव्दारे फेरबदल करून 'केट अपटन नेकेड आउटटेक फ्रॉम एसआय स्विमसूट 2014' या नावाने प्रकाशित केले आहे.
अपटनच्या कायदेशिर सल्लागार समितीने या वेबसाइला एक पत्र पाठवून बजावले आहे, की आपत्तीजनक छायाचित्रे लवकरात-लवकर काढून टाकली नाहीत तर खटला दाखल केला जाईल. या पत्रात अपटनच्या वकिलांनी तक्रार दाखल केली आहे, 'या छायाचित्रांमधील एका छायाचित्रात फेरबदल करण्यात आला आहे.'