आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉस्मेटिक सर्जरीला केट विंस्लेटचा विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘टायटॅनिक’ या प्रसिद्ध हॉलिवूड सिनेमाची अभिनेत्री केट विंस्लेटचे म्हणणे आहे की, ‘मी कॉस्मेटिक सर्जरीच्या विरोधात असून वृद्धत्व न येऊ देणारी उत्पादने मला आवडतात.’ 37 वर्षीय विंस्लेट आजही सुंदर, तरतरीत आणि सशक्त दिसते, परंतु यासाठी तिला कॉस्मेटिक सर्जरीवर अवलंबून राहणे पसंत नाही. अँटी एजिंग जेल आणि क्रीम सहजपणे असा लूक देऊ शकतात, असे ती मानते. ती म्हणते, ‘माझा कॉस्मेटिक सर्जरीला विरोध आहे. तथापि, आजकाल ही सर्जरी प्रसिद्ध होत चालली आहे, पण आपल्या आरोग्याची थोडीफार देखभाल करण्यासह जर अँटी एजिंग उत्पादनांचा वापर केला तर तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसू शकता.’