आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडला परतली केटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत सर्वात अधिक लोकप्रिय ‘हॅरी पॉटर’ या सिनेमात काम करणारी केटी लियुंगने अनेकदा हॉलिवूड सोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तिच्या नशिबात हॉलिवूड अभिनेत्री होणेच लिहिले आहे. या सिनेमाच्या पाचव्या भागात ‘हॅरी पॉटर’ला पहिल्यांदाच किस करणार्‍या केटीची ही छोटी भूमिका नंतर खूप खास झाली होती. त्यानंतर ती या मालिकेच्या तिन्ही सिनमांमध्ये दिसली होती. हॅरी पॉटर संपल्यानंतर केटी आपल्या घरी स्कॉटलँडला परतली होती. मात्र, तिने मागच्या वर्षी एका नाटकात भाग घेतला होता. ते पाहून तिला पुन्हा हॉलिवूडची ऑफर मिळाली आहे. चॅनल फोरच्या सिनेमात ती एका जपानी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती पायरेटेड डीव्हीडी विकण्याचे काम करत असते. खरं तर केटी अजून शिकत आहे. ती आपले शिक्षण पूर्ण करू इच्छित आहे. मात्र, चांगली ऑफर म्हणून तिने हा सिनेमा स्वीकारल्याचे ती सांगते.