आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूड सेलिब्रिटी किमचे बंदुकीचा धाक दाखवून 50 कोटींचे दागिने लुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस- हॉलीवूड सेलिब्रिटी किम कार्दिशियनचे येथील एका हॉटेलमध्ये बंदुकीचा धाक दाखवून 50 कोटी रुपयांचे दागिने लुटले. पोलिसांनुसार, पहाटे तीन वाजता पोलिसांच्या वेशात मुखवटा परिधान केलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी किमच्या फ्लॅटमध्ये घुसून दागिने चोरले. सुदैवाने किमला कोणत्याही दुखापत झाली नसल्याची माहिती किमच्या स्पोक्सपर्सनने दिली आहे.

किम सध्या पॅरिस फॅशन वीकसाठी पॅरिमध्ये आली आहे. तिच्यासोबत तिची आई क्रिस जेनर आणि दोन्ही बहिणी कोर्टनी कर्दशियन-केंडेल जेनर याही आहेत.

काय म्हणाला, किमचा स्पोक्सपर्सन...
- किमच्या स्पोक्सपर्सनने दिलेली माहिती अशी की, किम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे रविवारी पोलिसांच्या वेशात दोन अज्ञात व्यक्ती आले. दोघांंनी किमच्या डोक्यावर पिस्तूल रोखली. त्यांंनी चेहरा झााकलेला होता. सुदैवाने या घटनेत किमला कोणत्याही दुखापत झालेली नाही,

किमच्या पतीने अर्ध्यात सोडले फेस्टिव्हल...
- किमचा पती कान्ये वेस्ट रविवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये होता. तो मीडोज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता.
- त्याला 'फॅमिली इमरजन्सी'ची सूचना मिळताच, त्याने फेस्टिव्हल अर्ध्यात सोडले.
- सीएनएनचा रिपोर्टर फ्रेंक पेलोटाने 'ट्वीट' केले आहे की, 'वेस्ट अचानक उठून गेल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कोणालाच काहीही माहीत नव्हते.
दरम्यान, पॅरीसमध्ये दोन दिवसांपूर्वी किमला एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला होता. एका चाहत्याने किमच्या बटला (Butt) किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या सेक्युरिटी गार्डने त्याला पकडले.

अचानक झालेल्या प्रकाराने घाबरली होती किम..
सध्या पॅरीस फॅशन वीकसाठी किम पॅरिसमध्ये आहे. मोकळ्या वेळेत ती एका फॅशन हाऊसमध्ये गेली. ती बाहेर आली तेव्हा यूक्रेनचा जर्नालिस्ट विटाली सीजकने तिच्या बटला किस करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने ती घाबरून गेली होती. सोशल साइट्सवर सध्या तिचे फोटो व्हायरल होत आहेत. हॉलीवूड स्टार्सबरोबर असे प्रकार करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे असे म्हटले जाते. काही दिवसांपूर्वी त्याने सुपर मॉडेल गिगी हैदीदलाही मागून जाऊन उचलून घेतले होते. त्यावेळी गिगीने त्याच्या चेहऱ्यावर पंच मारला होता.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, चाहत्याने किमच्या बटला (Butt) किस करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचे PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...