Home »Hollywood» Kim Kardashian Want To Do Bold Photoshoot

या अॅक्ट्रेसला करायचे आहे आणखी एक Bold फोटोशूट, समोर आले हे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Sep 04, 2017, 00:00 AM IST

टीव्ही अॅक्ट्रेस किम कार्दीर्शियन तिच्या कामापेक्षाही तिच्या फोटोमुळे किंबहुना बोल्ड फोटोमुळे जास्त चर्चेत राहते. आता किम तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. किमचे म्हणणे आहे की, मुलाच्या जन्मानंतर तिचे स्लिम बॉडी फिगर दाखवण्यासाठी तिला बोल्ड फोटोशूट करायचे आहे. अत्यंत कठोर डाएटनंतर किम या फोटोशूटसाठी तयार असल्याचे म्हटले जात आहे. रियालिटी शो 'किपिंग अप विद कार्दशियन्स' ची ही 36 वर्षीय स्टार या फोटोशूटसाठी एखाद्या चांगल्या फोटोग्राफर किंवा मॅग्झिनच्या शोधात आहे.

किमला वाटते लोकांनी आपल्याबाबत विचार करावा..
किम कार्दीशियनचे म्हणणे आहे की, ती किती फिट आहे याचा विचार लोकांनी करायला हवा. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी परिश्रम घेतले की ते लोकांनी पाहावे असे आपल्याला वाटत असते. आधी मी याबाबत विचार केला नव्हता. पण मी आता फोटोशूटसाठी तयार आहे. गर्भवती असताना फार फोटो काढल्याचा पश्चाताप असल्याचे ती म्हणाली. कारण त्यावेळी मी फार जाड दिसत होते, असे तिचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, किम कार्दीशियनचे काही PHOTOS...

Next Article

Recommended