आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी गागाने आपल्या ड्रेसने पुन्हा केले आश्चर्यचकित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य गायिका लेडी गागा सतत आपल्या अनोख्या फॅशन आणि स्टाइलने चर्चेत असते. अलीकडेच ती एका पार्टीनंतर संगीत कार्यक्रमामध्ये लेटार्ड परिधान केलेली दिसली. 28 वर्षीय लेडी गागा शनिवारी (5 एप्रिल) एका पार्टीनंतर ऑफिशिअल लेडी गागा अ‍ॅट रोडलँडसाठी शनिवारी अचानक बीएमपी नाइटक्लबमध्ये पोहोचली. त्यावेळी तिने लेटार्ड परिधान केले होते.
वेबसाइट 'डेलीमेल डॉट को डॉट यूके'नुसार, गागाने स्टेजवर डान्ससुध्दा केला. यावेळी तिच्या जाळीदार स्टॉकिंगमधून तिच्या शरीरावर गोंदलेले टॅटूसुध्दा स्पष्ट दिसून येत होते.
'आर्टपॉप'ची ही गायिका रोजलँडमध्ये गेल्या सात रात्रींपासून प्रस्तुती देत आहे. ती सात एप्रिलला तिच्या सादरिकरणाचा शेवट करणार आहे. त्यादिवशी 52व्या स्ट्रीट रंगमंच 56 वर्षांनंतर बंद होणार आहे. त्या स्टेजवर परफॉर्मन्स करणारी गागा ही शेवटची कलाकार ठरणार आहे.