आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Life Of Pi Is A Four Time Winner At Visual Effects Society Awards

लाइफ ऑफ पाय, ब्रेव्ह यांना व्हिज्युअल अवॉर्ड्स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - आंग ली यांचा लाइफ ऑफ पाय व अँनिमेटेड ‘ब्रेव्ह’ चित्रपटांनी प्रत्येकी चार पुरस्कार पटकावून व्हेस (व्हिज्युअल इफेक्ट सोसायटी) अवॉर्ड्समध्ये बाजी मारली आहे. ली यांनी व्हिज्युअल इफेक्टच्या तंत्रज्ञानाने लाइफ ऑफ पायमध्ये बंगाल टायगर हुबेहूब साकारला. व्हिज्युअल इफेक्टच्या श्रेणीत हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला. स्टार वॉर फेम डेनिस मुरेन यांच्या हस्ते ली यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. द अव्हेंर्जसला दोन तर द इम्पॉसिबल व द हॉबिट : अँन अनएक्स्पेक्टेड जर्नी या चित्रपटांना प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला. एचबीओच्या गेम ऑफ थ्रो कार्यक्रमाने दूरचित्रवाणी र्शेणीतील सर्व चार पुरस्कारांवर आपले नाव कोरले.