आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन राजकारणात माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना जेवढा सन्मान दिला जातो तेवढाच सन्मान हॉलीवूड दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग यांना दिला जातो. जेव्हा स्पिलबर्ग यांनी लिंकन यांच्यावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेकांना त्यांचा हेवा वाटला कारण 'लिंकन' सारख्या व्यक्तीमत्वावर चित्रपट तयार करणे प्रत्येक दिग्दर्शकाचे स्वप्न असते.
अलीकडेच भारतात येऊन गेलेले स्टीवन स्पिलबर्ग पत्रकारांसोबतच्या चर्चासत्रावेळी सातत्याने आपले घड्याळ पाहत होते. या प्रकाराबद्दल एका महिला पत्रकाराने विचारले असता स्पिलबर्ग हसत म्हणाले की ‘मला अनिल अंबानीच्या घरी जेवायला जायचे आहे. मला नाही वाटत की त्यांनी माझी वाट पाहत बसावे. त्यांच्या माध्यम प्रतिनिधींनी इशारा करताच स्पिलबर्ग उठले आणि जाऊ लागले, पण नेमका त्यावेळीच त्या महिला पत्रकाराने शेवटचा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकून स्पिलबर्ग हसत परतले आणि म्हणाले ‘मला तुझा प्रश्न आवडला. मी याचे उत्तर नक्की देईन’.
ऑस्कर अवॉर्डसह अनेक प्रसिद्ध पुरस्कार मिळालेला हा जगप्रसिद्ध व्यक्ती एवढय़ा मोठ्या उंचीवर पोहोचून सुद्धा किती जमिनीवर आहे हेच त्यांच्या वागण्यातून दिसून येते. स्पिलबर्ग आज हॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांना फक्त ऑस्कर मिळत नाही तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा सुद्धा मिळवतो. लिंकनला तर 12 प्रकारांत अकॅडमी अवॉर्डचे नामांकन मिळाले. या चित्रपटाने जागतिक पातळीवर आतापर्यंत 22.50 कोटी डॉलरचा व्यवसाय केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.