आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंडसेच्या नवीन अफेअरची परिणती लग्नात, प्रियकर आर्नोसोबत थाटणार संसार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी अभिनेत्री आणि मॉडेल लिंडसे लोहान सध्या नवीन प्रियकर आर्नो विलियम्स लिवरपूलसोबत डेटिंग करत आहे. आर्नो लिवरपूल एक चांगला मॉडल आहे. परदेशात दीर्घकाळ एकत्र सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर दोघेही आता लग्न करण्याचा विचार करत आहे. दोघांनी ब-याच दिवसांपासून त्यांचे अफेअर लपून ठेवलेले होते. लिंडसेने आर्नोसोबतच्या भेटीला गुपित ठेवले आहे. आतापर्यंत दोघांचा सोबत एकच फोटो समोर आला आहे, आणि तोही सेल्फी आहे. एका वर्तमानपत्राच्या सांगण्यानुसार, लिंडसे आर्नोविषयी खूप गंभीर आहे आणि ती त्याला एक चांगला जोडीदार मानते.
दोघांची ओळख अलिकडे झालेल्या 'शांघाई फॅशन अवॉर्ड्स'मध्ये झाली होती. लिंडसे आर्नोच्या मॉडलिंग अंदाजामुळे प्रभावित झाली होती. तिच्या मते, आर्नोसोबत खूप वेळ घालवल्यानंतर तिला त्याचे अनेक गुणवैशिष्टे समजले. विशेष म्हणजे लिंडसेचे हे पहिलेच असे अफेअर आहे जे लग्नापर्यंत पोहोचले आहे.