एन्टरटेन्मेंट डेस्क : गोल्डन ग्लोब 2017 च्या रेड कार्पेटवर हॉलिवूड अॅक्ट्रेस लोला किर्के तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या अवॉर्ड सेरेमनीत ती डिझायनर Andrew Gn यांच्या पिंक पेटल स्ट्रेपलेस गाऊनमध्ये पोहोचली होती. रंजक गोष्ट म्हणजे, लोलाने काखेतील केस स्वच्छ केले नव्हते. अशाच अवस्थेत ती कॅमे-यासमोर पोझ देत होती. इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करुन तिने लिहिले, "Ok! Now I'm really ready. Thanks to all you beautiful people who didn't send me death threats on account of my #awesome #hairyarmpits!"
'गोन' गर्ल नावाने प्रसिद्ध...
26 वर्षीय लोलाचा जन्म 27 सप्टेंबर 1990 रोजी लंडनमध्ये झाला. गोन गर्ल (2014), मिस्ट्रेस अमेरिका (2015), AWOL (2016) या सिनेमांसोबत ती लोला लॉ एंड ऑर्डर (2013), द लेफ्टओवर्स (2014) आणि मोजार्ट इन द जंगल (2014-Now) या टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. 'गोन' गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली लोला यापूर्वीही हेयरी आर्मपिटसोबत अनेकदा दिसली आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर क्लिक झालेले लोला किर्केचे Photos....