आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या तोट्याचेही रेकॉर्ड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हॉलीवूडचे दिग्गज स्टार जॉनी डेप यांचा नवा साहसपट ‘लोन रेंजर’मधून प्रसिद्ध चित्रपट निर्माता स्टुडिओ डिस्नेला अब्जावधी रुपयांचा तोटा होईल. संभाव्य तोटा 16 कोटी ते 19 कोटी डॉलर म्हणजे 975 कोटी रुपये ते 1160 कोटी रुपये होऊ शकतो. डिस्नेने लोन रेंजर तयार करण्यासाठी 21.5 कोटी डॉलर आणि त्याच्या मार्केटिंग व प्रसिद्धीसाठी सुमारे 2650 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.

चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1100 कोटी रुपये कमाई केली आहे. बॉलीवूडमध्ये तिकिट खिडकीवर 100 कोटी रुपये कमाई करणार्‍या चित्रपटाची मोठी प्रसिद्धी होते. हॉलीवूडमध्ये 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करणार्‍या चित्रपटांची गणना अयशस्वी चित्रपटांच्या यादीमध्ये होते.

हॉलीवूड चित्रपट निर्मितीचा खर्च बॉलीवूडच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त असतो, हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. डिस्नेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख रिक रॉस यांना हटवून 70 वर्षीय एलेन हॉर्न यांना अध्यक्षपद देण्यात आले आहे. यातून सर्व काही स्पष्ट होते. रॉस यांनी आपल्या कार्यकाळात जॉन कार्टर नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. इतिहासात हा सर्वात आपटी खाल्लेला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातून डिस्नेला 20 कोटी डॉलर(सुमारे 1200 कोटी रुपये) नुकसान झाले.

गेल्या वर्षी प्रदर्शित एव्हेंर्जस चित्रपटाने जगभरात केवळ तिकिट विक्रीतून 1.3 अब्ज डॉलर (सुमारे 7800 कोटी रुपये) कमाई केली आहे. या चित्रपटाला आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणार्‍या चित्रपटांच्या यादीत चौथे स्थान प्राप्त झाले आहे. एव्हेंर्जसमुळे डिस्ने तरले आहे. भारतीय वंशाचे हॉलीवूड निर्माते नाइट श्यामलन यांचा यावर्षी प्रदर्शित आफ्टर अर्थचा आपटलेल्या चित्रपटात समावेश आहे.

हॉलीवूड स्टार विल स्मिथच्या विज्ञान कथेवर आधारित या चित्रपटावर सोनी पिक्चर्सने 13 कोटी डॉलर (सुमारे 800 कोटी रुपये) खर्च केले. मात्र, चित्रपट 200 कोटी रुपये कमाई करू शकला नाही. अनिल अंबानी यांच्या गुंतवणुकीतून तयार करण्यात आलेल्या काऊब्लॉय अँड एलियन मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. डेनियल क्र्रेग आणि हेरिसन फोर्ड यांच्या चित्रपट निर्मात्या कंपनीला अंदाजे 460 कोटी रुपये (7.5 कोटी डॉलर) तोटा झाला आहे.