आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम-केन्येने हनीमूनसाठी निवडले आयरलँड, बघा कपलची काही रोमँटिक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची टीव्ही स्टार 33 वर्षीय किम कर्दाशिअन आणि 37 वर्षीय रॅपर केन्ये वेस्ट मागील आठवड्यात अधिकारिकरित्या लग्नगाठीत अडकले आहेत. 24 मे रोजी दोघांनी इटलीच्या फ्लोरेंस शहरामध्ये लग्न केले. सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लग्नानंतर या जोडीला एक कॉन्फेन्डेंशिअल मॅरेज लाइसेन्स देण्यात आले आहे. यानंतर आता त्यांना सर्वजनिक ठिकाणी भटकण्यास कुणीही अडवू शकत नाही.
किम आणि केन्ये ऑक्टोंबर 2013नंतर जवळपास दीड वर्षापासून एकमेकांना डेटींग करत होते. यादरम्यान मागील वर्षी 15 जून रोजी यांना एक मुलगी झाली. केन्येचे पहिले लग्न असून किमचे तिसरे आहे.
लग्न केल्यानंतर किम कर्दाशिअन आणि केन्ये हनीमूनसाठी आयरलँडला गेले होते. सध्या ते एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. किम आणि रॅपर केन्येच्या खासगी विमानाने रविवारी (25 मे) दुपारी कॉर्क एअपोर्टवर लँडिंग केली. ही जोडी Castlemartyr Resort पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा किम आणि केन्येची काही रोमँटिक छायाचित्रे...