आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडोनाने पोस्ट केला दत्तक घेतलेल्या मुलांचा आक्षेपार्ह फोटो, विरोधांचा करतेय सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाश्चिमात्य गायिका मेडोनाला लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच मेडोनाने दत्तक घेतलेल्या कृष्णवर्णीय मुले डेव्हिड रिच आणि मर्सी जेम्सचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती मुले मेडोनाच्या पायांची मालिश करताना दिसत आहेत. मेडोनाने या फोटोखाली लिहिले होते, 'madonna#motherlove...............how I'm gonna get through the day. Mercy and David give the best foot rubs!!!' (आईच्या प्रेमासाठी... मर्सी आणि डेव्हिड पायांना चांगली मालिश देतात.)
हा फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होताच लोकांनी मेडोनावर आरोप लावण्यास सुरुवात केली. लोकांचे म्हणणे आहे, की मेडोना कृष्टवर्णीय मुलांना दत्तक घेऊन त्यांच्याकडून गुलामी करून घेतेय.
काही लोकांनी मेडोनाला आफ्रिकेकडून 'गुलाम गॉड' घेतले असल्याचे म्हटले तर काहींनी लिहिले, की विश्वास बसन नाही आजसुध्दा मेडोना पायांच्या मालिशसाठी गुलाम ठेवते. मात्र मेडोनाचे काही चाहते तिचे समर्थनदेखील करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दत्तक घेतलेल्या मुलांसोबतची मेडोनाची छायाचित्रे...