(फोटोः इंटरव्यूच्या मॅगझिनवर मेडोना)
लंडनः ग्लोबल पॉप आयकॉन म्हणून ओळखल्या जाणा-या मेडोनाने 'इंटरव्यू' नावाच्या मॅगझिनसाठी एक हॉट फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये मेडोना चक्क टॉपलेस दिसतेय. वयाच्या 56व्या वर्षी टॉपलेस फोटोशूट करणा-या मेडोनाने कबूल केले, की तिला प्रत्येक प्रकारचे व्यसन होते. ती म्हणाली, "मी प्रत्येक गोष्ट ट्राय केली आहे. जेव्हा मला ड्रग्सची नशा चढायची तेव्हा माझा अधिक वेळ पाणी पिण्यात जायचा. जेणेकरुन ड्रग्स माझ्या शरीराबाहेर पडले." मेडोनाने पुढे म्हटले, की लोक ईश्वराला जवळून बघण्यासाठी ड्रग्सची मदत घेतात.
म्हणाली, वेश्यावृत्ती महत्त्वाचा व्यवसाय...
मेडोना म्हणाली, "
आपल्याला मृत्यू कधी येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. मी क्रिएटीव्ह लोकांकडे जास्त आकर्षित होते. माझ्या मते, वेश्यावृत्ती हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे."
पहिल्यांदाच केले नाही न्यूड फोटोशूट...
मेडोनासाठी बोल्ड फोटोशूट करणे ही नवीन बाब नाहीये. तिने यापूर्वी अनेकदा बोल्ड फोटो काढून घेतले आहेत. वयाच्या अठराव्या वर्षी तिने फोटोग्राफर हरमन कुलकेंससाठी न्यूड फोटोशूट केले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इंटरव्यू मॅगझिनसाठी मेडोनाने केलेल्या फोटोशूटची छायाचित्रे...