आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मल्लिकाने अंटोनियो बेंडारेसशी अफेअर असल्याचे नाकारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः मल्लिका शेरावत आणि बॉलीवुड अभिनेता अंटोनियो बेंडारेस
‘द मास्क ऑफ जोरो’, ‘डेस्पराडो’ आणि ‘फिलाडेल्फिया’सारख्या लोकप्रिय हॉलीवूड सिनेमांचा अभिनेता अंटोनियो बेंडारेसचे 1996 मध्ये अभिनेत्री मेलेनी गिफ्रिथशी लग्न झाले होते. लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली असताना त्यांनी याच महिन्यात घटस्फोट घेतला आहे. या दोघांच्या कथेमध्ये मल्लिका शेरावतचे नाव फ्रान्सच्या कान शहरात दोघे सोबत डान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर पुढे आले. मल्लिकाचा कथित मित्र असलेल्या इवान बित्तों मल्लिकाचे आणि बेंडारेसचे अफेअर चालू असल्याचे सांगितले होते.
मल्लिकाने मात्र यामध्ये सत्यता नसल्याचे सांगितले आहे. तिने ‘ई न्यूज’ या बॉलीवूडमधील रंजक बातम्यांच्या मासिकाला सांगितले की, बेंडारेस माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येण्यामध्ये माझ्या मैत्रीचा काहीही संबंध नाही. मल्लिकाने पुढे सांगितले की, ‘अंटोनियो बेंडारेस चांगले डान्सर आहेत. मी त्यांच्यासोबत कुठेही सुटी साजरी करण्यासाठी गेले नव्हते. उलट त्यांचा घटस्फोट झाल्याचे मला खूप दु:ख आहे.’
मल्लिकाने इवानने पसरवलेल्या अफवेबद्दलदेखील स्पष्टीकरण दिले. इवानला काही दिवसांपूर्वी मी नोकरीतून काढून टाकले होते. त्यामुळे तो सूडभावनेतून माझी बदनामी करण्याचे उद्योग करत आहे.