आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किम कार्दशियनसारखे दिसावे म्हणून याने तब्बल 50 वेळा केली सर्जरी, अता दिसतो असा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किम कार्दशियनचे चाहते संपूर्ण जगात आहेत. एका चाहत्याने तर तिच्यासारखे दिसण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये खर्च करून सर्जरी केली. यावरूनच ती तरूणांमध्ये किती प्रसिद्ध आहे, याचा अंदाज येईल. तिच्या बर्मिंघम येथे राहणाऱ्या जॉर्डन पार्कके या चाहत्याने 6 वर्षांत तब्बल 50 कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत. नुकताच त्याने त्याच्या लुकचा खुलासा केला.
लिप्स सर्जरीमुळे नाखूश...
जॉर्डनने आता पर्यंत दोन वेळा नाकाची सर्जरी, एकदा चिन इम्प्लांट, आईब्रो टॅटूज, लिप फिलर, जॉ लाइन फिलर, नॉन सर्जिकल फेस लिफ्ट, लेजर हेयर रिमूव्हल, फुल फेस बोटेक्स आणि वॅम्पायर ट्रीटमेंट्स केल्या आहेत. 25 वर्षांचा जॉर्डन म्हणतो की, हा अतंयत त्रासदायक एक्सपेरियंस होता. तरीही मी "पेन इज ब्यूटी" असेच म्हणेल. एवढेच नाही तर तो लिप्स सर्जरीमुळेही नाखुश असून त्याला आता नॅचरल पाउट लुक हवा आहे. त्या साठी तो पुन्हा सर्जरी करणार असल्याचेही त्याने सांगितले.
रस्त्यावर लोक म्हणतात किम...
जॉर्डन सांगतो की, तो वयाच्या 19 व्या वर्षांपासूनच कीमचा चाहता आहे. लोक त्याला किम कार्दशियन म्हणून संबोधतात. म्हणूनच त्याने किम सारखे दिसण्याचा निर्णय घेतला आणि सर्जरी केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याचे इतर काही संबंधित Photos...
बातम्या आणखी आहेत...