आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मर्लिनने याच घरात घेतला होता अखेरचा श्वास, आता होणार आहे घराची विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूडची सौंदर्यवती मर्लिन मुनरोच्या लॉस एंजिलिस येथील घराची विक्री होणार आहे. या घराची किंमत 44 कोटी एवढी ठेवण्यात आली आहे. 1962 साली याच घरात मर्लिनने अखेरचा श्वास घेतला होता. व्हरायटी या हॉलिवूड मॅगझिननुसार, तिसरे पती आर्थर मिलरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मर्लिन 1962 साली कॅलिफोर्नियाच्या याच घरात शिफ्ट झाली होती. पण अवघ्या काही महिन्यांत ती या घरात मृतावस्थेत आढळून आली होती. 

2,624 स्वेअर फूट परिसरात आहे हे घर...  
मर्लिन मुनरोचे हे घर 2,624 स्वेअर फूट परिसरात आहे. यामध्ये चार बेडरुम आणि चार बाथरुम आहेत. याशिवाय या घरात कोर्टयार्ड, बॅकयार्ड, गेस्ट हाउस, स्वीमिंग पूल, ग्रीन ग्रासचे मैदान आणि एक सुंदर बगीचा आहे. किचनसुद्धा मॉर्डन स्टाइलचे आहे. घरात हँगिंग लॅम्प लावण्यात आले आहेत. रिअल इस्टेट एजंट लीसा आप्टिकनने सांगितले, की मर्लिनला तिच्या बेवर्ली हिल्सस्थित एका मोठ्या बंगल्यापेक्षा हेच घर अधिक पसंत होते.  मर्लिनने हे घर त्याकाळी 48 लाखांमध्ये खरेदी केले होते.  

पुढील स्लाईड्सवर बघा, मर्लिनच्या घराचे 6 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...