आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेमाच्या सेटवर थोडक्यात बचावला वॉल्बर्ग, जाणून घ्या कसा घडला अपघात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परदेशात धूम घालणारा हॉलिवूड 'लोन सर्वाइवर' सिनेमाच्या यशामागे अनेक रंजक गोष्टी आहेत. भारतात 7 फेब्रुवारीला रिलीज होणा-या या सिनेमाचा अभिनेता मार्क वॉल्बर्गला त्याचा जिव धोक्यात घालावा लागला होता.
शुटिंगच्या दरम्यान जेव्हा युध्दाचे सीन चित्रीत करण्यात येत होते तेव्हा सिनेमाचा दिग्दर्शक पीटर बर्गने दोन फुटापेक्षा जास्त अंतरावरून तोफ उडवली होती, त्यामुळे वॉल्बर्ग जखमी झाला होता. या दुर्घटनेत त्याचा जिव धोक्यात आला होता.
दिग्दर्शक पीटर बर्ग म्हणाला, की त्याने चुकून ती तोफ उडवली होती. ही घटना खूप भयानक होती. थोडावेळ त्याला वाटले, की त्याने वॉल्बर्गला गमावले. वॉल्बर्गसुध्दा अस्वस्थ झाला होता, परंतु या घटनेच्या काहीवेळाने वॉल्बर्गने पुन्हा शुटिंगला उत्साहाने सुरूवात केली.
या सिनेमाची पटकथा 'लोन सर्वाइवर' नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये युध्दात वाचलेल्या एका व्यक्तीविषयी सांगण्यात आले आहे. सिनेमात युध्द वास्तविक वाटण्यासाठी वीएफएक्स किंवा ग्रीन स्क्रीनचा वापर करण्यात आलेला नाहीये.