आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉबीन विल्यम्स : ग्लॅमरच्या चेहर्‍यामागे लपला होता नैराश्याचा अंधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलीवडू अभिनेता रॉबर्ट विल्यम्स यांनी काही चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका केल्या होत्या. त्यांना गुडविल हंटिंगमध्ये सहायक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. तीन वेळा उत्कृष्ट अभिनेत्यासाठी त्यांच्या नावाचा विचार झाला, परंतु त्यांची ओळख उच्च कोटीचे हास्य कलाकार म्हणूनच विशेष करून राहिली. एकदा ते म्हणाले होते, तुमच्यामध्ये वेडेपणा आणि हास्याची चमक उसळते, तिला तुम्ही अव्हेरले तर तुमच्यात काहीच उरत नाही. खरोखरच त्यांची चमक जंगलातील आगीसारखी होती. त्यांच्या हास्य अभिनयाने जगभरात आनंद आणि सुख भरले होते.

कदाचित, स्वत:खेरीज त्यांनी कोणालाही हानी पोहोचवली नव्हती. त्यांना कोकेन आणि दारूचे व्यसन लागले होते. त्यापासून सुटका होण्यासाठी त्यांचे उपचार सुरू होते. तिसरी पत्नी सुसान श्निडरला ते कायमचे सोडून गेले. रॉबिन यांना नैराश्याने ग्रासले होते. हास्य अभिनेत्यांसाठी हा आजार म्हणजे आश्चर्य नाही. 11 ऑगस्टला 63 वर्षीय रॉबिन यांनी जेव्हा गळफास घेऊन जीवन संपवले, तेव्हा त्यांचे चाहते स्तब्ध झाले.

अलादीन, रोबोट आणि हॅपी फिटमध्ये रॉबिन मॅक्लॉरेन विल्यम्सनी वठवलेल्या कार्टून्सच्या भूमिका लोकांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या हास्य अभिनयात गोड दु:खाची झलर असायची. रॉबिन यांचे वडील रॉबर्ट यांचा मृत्यू 1987 मध्ये झाला. 1998 मध्ये ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना रॉबिन म्हणाले, जेव्हा मी वडिलांना म्हणालो की, मला अभिनेता बनायचे आहे, तेव्हा ते म्हणाले होते, खूप छान. मात्र सोबत एखादा वेल्डिंगसारखा धंदा करत राहा, असा सल्ला दिला होता. रॉबिन यांची आई लॉरी मॉडेल होती. शाळेत असताना रॉबिन एका नाटकमंडळीत सामील झाले. सुपरमॅन चित्रपटांचा नायक क्रिस्तोफर रीव्ह न्यूयॉर्क सिटी ज्युलियार्ड स्कूलमध्ये त्यांचा वर्गमित्र होता.

रॉबिनच्या हास्य अभिनयाचे चाहते असंख्य होते, पण त्यांचे अनुकरण कोणालाही जमले नाही. त्यांच्या मोर्क अँड मिंडी शोने टीव्ही कॉमेडीचे विश्वच बदलून टाकले. ते चित्रपटांमध्ये हास्य अभिनयापुरते सीमित राहिले नाहीत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. गुड मॉर्निंग व्हिएतनाम चित्रपटांत डीजे, डेड पोएट्स सोसायटीत शिक्षक आणि द फिशर किंगमध्ये डीजेच्या भूमिकांमुळे त्यांना उत्कृष्ट अभिनेता नॉमिनेशन मिळाले होते. त्यांचे बहुतांश चित्रपट हृदयस्पर्शी असत. त्यांच्यात काही संदेश असायचा.

वैशिष्ट्ये
विल्यम्सनी सेंट ज्यूड बाल रुग्णालयाच्या मदतीसाठी अनेक शो केले.
त्यांनी सुमारे बारा देशांमध्ये तैनात अमेरिकन सैनिकांसाठी कार्यक्रम केले.
बेघर लोकांच्या मदतीसाठी एचबीओ वाहिनीच्या विशेष शोच्या माध्यमातून पाच कोटी डॉलर गोळा केले.
विल्यम्सनी गेल्या वर्षी टीव्ही मालिका क्रेझी वन्समध्ये भाग घेतला.