आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Jackson's Daughter Paris Attempt Suicide?

दिवंगत पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या 15 वर्षीय मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस अँजेलिस - पॉप स्टार मायकल जॅक्सनची 15 वर्षीय मुलगी पॅरिस जॅक्सनने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने बुधवारी रात्री तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पॅरिसवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पॅरीसची आई डेबी रोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅरिस लॉस अँजेलिसमधील रुग्णालयात असून तिची प्रकृती स्थिर आहे. सेलिब्रिटी वेबसाईट TMX.COM ने पॅरिसने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी ब्रेक केली होती.

'पॅरिसची तब्बेत उत्तम असून तिला योग्य वैद्यकिय मदत मिळत आहे', असे तिची आजी कॅथरिक जॅक्सन यांनी एका निवेदनातून स्पष्ट केले आहे. 15 वर्षीय मुलं संवेदनशील असतात. जेव्हा आपण एखाद्याला गमावतो, तेव्हा परिस्थिती खूपच कठीण होत असते. पॅरिस अजूनही आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेली नाही. त्यामुळे तिची जास्त काळजी घ्यावी लागत आहे.

तर दुसरीकडे पॅरिकची आई डेबी रॉव हिने पॅरिसची मानसिक अवस्था ठीक नसून त्या घरात बऱ्याच गोष्ट घडत असल्याचे सांगितले. मात्र याबाबत अधिक काहीही बोलण्यास नकार दिला.

2009 मध्ये मायकल जॅक्सनचा औषधाच्या ओव्हर डोसमुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून पॅरिस तिच्या 83 वर्षीय आजी बरोबर राहते.