आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : याच घरात मायकलने घेतला होता अखेरचा श्वास, प्रति महिना होते 49 लाख रुपये भाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माइकलच्या लॉस एंजिलिस स्थित घरातील छायाचित्र)
मायकल जॅक्सन संगीत क्षेत्रातील असे नाव आहे, जे त्याच्या निघून जाण्यानंतर आजही स्मरले
जाते. मायकल लग्झरी आयुष्य जगण्याचा शौकिन होता. करिअरमध्ये यशोशिखरावर पोहोचल्यानंतर त्याने एक आलिशान बंगला खरेदी केला होता.
पहिले घर - कॅलिफोर्नियास्थित Neverland Ranch नावाचा बंगला मायकलने 1988मध्ये खरेदी केला होता. तेव्हा हे घर Sycamore Valley Ranch नावाने ओळखले जात होते. हा बंगला किती रुपयांत खरेदी करण्यात आला होता, हे उघड झाले नाही. 2676 एकरमध्ये पसरलेल्या या दोन मजली बंगल्यात पाच लग्झरी बेडरुम, एक मीडिया रुम, मोठे किचन आणि मोठी लायब्ररी आहे. 2005 पर्यंत मायकल या घरात वास्तव्याला होता. मात्र नंतर घराचे मेंटेनन्स आणि स्टाफचा पगार देऊ न शकल्यामुळे मायकलने 2008 मध्ये हे विक्रीस काढले होते.
दुसरे घर - लॉस एंजिलिसमधील होलम्बी हिल्स परिसरात मायकलचे दुसरे घर होते. डिसेंबर 2008मध्ये मायकलने हे घर लीजवर घेतले होते. त्यावेळी या घराचे भाडे एक लाख डॉलर म्हणजेच जवळजवळ 49 लाख रुपये (त्या काळातील रुपयाच्या मुल्यानुसार) प्रति महिना होते. या घरात मायकल सहा महिने राहिला. काही दिवसांनी या घराचा लिलाव करण्यात आला होता. या घरात मायकल वास्तव्याला असल्यामुळे हे घर दुप्पट किंमतीला विकले गेले होते.
मायकलचे हे घर 17,171 स्वे. फूट परिसरात पसरले होते. तीन मजली असलेल्या या बंगल्यात गेस्ट हाऊस, सात बेडरूम, 13 बाथरुम, डायनिंग स्पेस, सेपरेट इटिंग रुम, लिव्हिंग रुम, एन्ट्रन्स हॉल, थिएटर रुम, जिम, स्पा सेंटर, लायब्ररी, किचन आणि मोठे स्विमिंग पूल होते. 2002 मध्ये या घराची निर्मिती करण्यात आली होती. याच घरात मायकलने अखेरचा श्वास घेतला. मायकलच्या निधनानंतर या घरातील अनेक वस्तूंचादेखील लिलाव करण्यात आला होता.
नोट : स्टार्स होम्स नावाच्या या स्पेशल सीरिजमध्ये आम्ही तुम्हाला पॉप सिंगर मायकल जॅक्सनच्या घराची छायाचित्रे दाखवत आहोत.या दोन्ही घरांची विक्री करण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मायकल जॅक्सनच्या दोन्ही घरांची ही खास छायाचित्रे...