आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Miss South Africa Rolene Strauss Crowned Miss World 2014

दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस ठरली मिस वर्ल्ड 2014, ऐश्वर्याला करण्यात आले सन्मानित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः मिस वर्ल्ड 2014 रोलेन स्ट्रॉस आणि शेजारी पती अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन)
लंडनः दक्षिण आफ्रिकेच्या 22 वर्षीय रोलेन स्ट्रॉस हिने मिस वर्ल्ड 2014चा मुकूट आपल्या नावी केला आहे. मिस हंगरी एडिना कुलसारने दुसरे, तर अमेरिकेच्या एलिझाबेथ सेफ्रिटने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. मिस वर्ल्ड स्पर्धेचे हे 64 वे वर्ष होते. जगभरात जवळजवळ एक अब्ज लोकांनी हा शो टीव्हीवर लाइव्ह पाहिला. या सौंदर्य स्पर्धेत जगभरातील 121 देशांतील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. भारताच्या वतीने जयपूर येथील कोयल राणाने अंतिम दहामध्ये स्थान पटकावले, अंतिम पाचमध्ये ती स्थान मिळवू शकली नाही.
देशासाठी मुकूट...
2013 मध्ये मिस वर्ल्ड ठरलेल्या फिलिपिन्सच्या मेगॉन यंगने रोलेनला मिस वर्ल्डचा मुकूट घातला. हा किताब आपल्या नावी केल्यानंतर रोलेनने म्हटले, की हा किताब माझ्या देशासाठी आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे रोलेन म्हणाली.
मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करणारी रोलेन दक्षिण आफ्रिकेतील तिसरी सौंदर्यवती आहे. यापूर्वी 1958 आणि 1974मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सौंदर्यवतींनी हा किताब आपल्या नावी केला होता. 1951 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
ऐश्वर्या राय बच्चनचा खास सन्मान...
या शानदार सोहळ्यात माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी तिचे पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या आणि आई वृंदा राय तिच्यासोबत मंचावर उपस्थित होते. 1994मध्ये ऐश्वर्याने हा किताब आपल्या नावी केला होता. गेल्या वीस वर्षांत माजी जगतसुंदरी म्हणून ऐश्वर्याने केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून तिला या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
शेवटच्या पाचमध्ये स्थान पटकावण्यात अपयशी ठरली कोयल राणा...
मिस वर्ल्ड 2014च्या स्पर्धेत कोयल राणाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कोयलने टॉप 10मध्ये स्थान पटकावले, मात्र टॉप 5पर्यंत ती मजल मारु शकली नाही.
भारताच्या वतीने यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्राने हा किताब आपल्या नावी केला होता. तेव्हापासून एकही इंडियन ब्युटी हा किताब आपल्या नावी करु शकली नाही.
दोन श्रेणीत मिळाला कोयल राणाला पुरस्कार
कोयल टॉप 5 मध्ये मजल मारण्यात अपयशी ठरली. मात्र या सोहळ्यात तिने दोन पुरस्कार आपल्या नावी केले. बेस्ट डिझायनर सेग्मेंटमध्ये कोयलला पुरस्कार मिळाला. कोयलने शेवटच्या फेरीत फाल्गुनी आणि शेन पिकॉक यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. याशिवाय ब्युटी विथ पर्पज हा पुरस्कारसुद्धा कोयलला मिळाला. हा पुरस्कार भारतासोबतच केन्या, गुयाना, ब्राझील आणि इंडोनेशियाच्या सौंदर्यवतींना विभागून देण्यात आला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सोहळ्यातील खास छायाचित्रे...