आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • When Model Actor Omar Borkan Al Gala Was \'Deported\' From Saudi Arabia For Being Too Handsome

जास्तीच हॅण्डसम असल्याने या तरुणाची झाली देशातून हकालपट्टी, असे जगतो लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमर बोरकान अल गाला - Divya Marathi
उमर बोरकान अल गाला

एन्टरटेन्मेंट डेस्क: worldstopmost.com ने नोव्हेंबर महिन्यात जगातील सर्वात सुंदर दहा पुरुषांची नावे जाहीर केली आहेत. जगातील सर्वात हॅण्डसम पुरुषांच्या यादीत अभिनेता हृतिक रोशनला तिसरे तर सलमान खानला सातवे स्थान मिळाले आहे. या यादीत सहाव्या क्रमांकावर दुबई बेस्ड मॉडेल, अॅक्टर, फॅशन फोटोग्राफर आणि रायटर उमर बोरकान अल गालाच्या नावाचा उल्लेख आहे. उमरची गणना जगातील सर्वात लोकप्रिय इंटरनेट सेंसेशन म्हणून केली जाते. रिपोर्ट्सनुसार, 'जास्ती हॅण्डसम' असल्यामुळे उमरला सऊदी अरबमधून देशाबाहेर काढण्यात आले आहे. फॅनने गिफ्ट केली मर्सिडीज कार...

29 वर्षीय उमर मिडल ईस्ट देशांत अतिशय लोकप्रिय आहे. महिला त्यांच्या डायहार्ड फॅन आहेत. एका मुलाखतीत उमरने सांगितले होते, की एका फिमेल फॅनने त्याच्या वाढदिवसाला त्याला मर्सिडीज G55 (किंमत सुमारे 1.3 कोटी) कार गिफ्ट केली होती. उमरला त्या फॅनचे नाव माहित नव्हेत आणि कधी तिच्याशी त्याची भेटसुद्धा झाली नव्हती.

सऊदीहून कॅनडात झाला शिफ्ट..
सऊदी अरबची राजधानी रियादमध्ये उमर एकदा धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. याच कार्यक्रमात तो अतिशय हॅण्डसम असल्याने त्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले होते. लोकल मीडियानुसार, उमर सऊदी अरबनुसार खूप जास्त सेक्सी होता, त्यामुळे त्याला देशातून हाकलण्यात आले. या घटनेनंतर तो त्याच्या कुटुंबासोबत वँकुवर (कनाडा) येथे शिफ्ट झाला. या वादानंतर तो जास्त चर्चेत आला होता. इंटरनेट सेंसेशन उमरचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॅन्स आहेत. फेसबुकवर सुमारे अडीच कोटी, ट्विटरवर ऐंशी हजार आणि इन्स्टाग्रामवर 85 हजार फॉलोवर्स आहेत. लोकप्रियतेच्या बळावर उमरला शॉर्ट फिल्म '51'मध्ये भूमिका मिळाली होती.

एका मुलाचा वडील आहे उमर
उमरने त्याची गर्लफ्रेंड यास्मीन ओवेदासोबत निकाह केला आहे. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात या दाम्पत्याच्या घरी मुलाचा जन्म झाला असून त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव तेयाब असे ठेवले आहे. सोशल मीडियावर उमरने पत्नी यास्मीन आणि मुलासोबतचे बरेच फोटोज शेअर केले आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, उमर आणि त्याच्या फॅमिलीचे Latest Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...