(फाइल फोटो: ऑस्कर विजेती हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स)
न्यूयॉर्क- हॉलिवूडच्या 100पेक्षा जास्त अभिनेत्री, गायिका, सेलिब्रिटी हॅकिंगच्या शिकार झाल्या आहेत. कथितरित्या त्यांचे विवस्त्र छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट करण्यात आली आहेत.
सांगितले जाते, की सेलिब्रिटी संबंधित ही आजपर्यंतची सर्वात मोठी हॅकिंगची घटना आहे. ज्या प्रसिध्द चेह-यांना निशाणा बनवण्यात आले आहे, त्यामध्ये ऑस्कर पुरस्कार जिंकलेली जेनिफर लॉरेन्स, पाश्चिमात्य गायिका रिहाना आणि टीव्ही स्टार किम कर्दाशिअनसारख्या अभिनेत्रींचा सामावेश आहे. लॉरेन्सने या घटनेला प्रायव्हेसीचा दुरुपयोग म्हणून सांगितले आहे. तसेच, आरोपीच्या विरोधात कारवाई व्हायला हवी असेही ती म्हणाली. घटना समोर आल्यानंतर या अभिनेत्रींची छायाचित्रे टि्वटरवरून काढून टाकण्यात आली आहेत. ज्या अकाउंटवरून ही छायाचित्रे पोस्ट करण्यात आली होती, ते बंद करण्यात आले आहे.
हे सेलेब्स बनले निशाणा-
ज्या सेलिब्रिटींची खासगी छायाचित्रे चोरी करून इंटरनेटवर टाकण्यात आली आहे, त्यामध्ये जेनिफर लॉरेन्स, पाश्चिमात्य गायिका रिहाना, किम कर्दाशिअन, हिलेरी डफ, जेनी मॅककार्थी केली कुक्रो, केट अप्टन, केट बोसवॉर्थ, केके पाल्मर, एव्हरिल लॅव्हिग्ने, अॅम्बेर हेअर्ड, गॅब्रिल यूनिअन, हेडन पॅनिटेअर, होप सोलोसारखे प्रसिध्द चेहरे सामील आहेत. शिवाय, ऑस्ट्रेलिया मॉडेल पाल्मरचीसुध्दा काही छायाचित्रे पोस्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये ती माजी बॉयफ्रेंड स्कॉट स्पीडमॅनसह खासगी क्षण घालवताना दिसत आहे.
हॅकरकडे लॉरेन्सची 60 न्यूड छायाचित्रे...
ज्या सेलिब्रिटींची न्यूड छायाचित्रे हॅक करण्यात आली आहे, ती छायाचित्रे खरी आहेत की खोटी याचे पुरावा नाहीये. काहीं सेलेब्सनी प्रायव्हेसीचा दुरुपयोग केला असल्याचे सांगितले तर काहींना छायाचित्रे खोटी म्हणून सांगितली आहेत. ज्या हॅकरने ही घटना घडवून आणली त्याने सांगितले, की त्याच्याकडे लॉरेन्सची 60 न्यूड छायाचित्रे आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या न्यूड छायाचित्रे हॅक झालेल्या सेलिब्रिटींविषयी...