(इटॅलियन-अमेरिकन अभिनेत्री-गायिका नादिया लॅनफ्रेंकॉनी)
मुंबईः हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका नादिया लॅनफ्रेंकॉनी (Nadia Lanfranconi) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इटॅलियन-अमेरिकन गायिका आणि संगीतकार म्हणून ओळखल्या जाणा-या नादियाने बॉलिवूडमध्ये पदार्पणाची पूर्ण तयारीसुद्धा केली आहे. याशिवाय नादियाची ओळख मेल गिब्सनची पुर्वाश्रमीची प्रेयसी म्हणूनही आहे.
दिग्दर्शक-निर्माते सुनील बब्बर यांच्या आागामी मेलोडी या सिनेमात नादिया झळकणार आहे. इतकेच नाही तर या सिनेमाची ती संगीतकारसुद्धा असणार आहे.
या सिनेमाविषयी दिग्दर्शक-निर्माते, सुनील बब्बर यांनी सांगितले, "मेलोडी माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या सिनेमात बॉलिवूड आणि हॉलिवूडचे कलाकार एकत्र काम करणार आहेत. एक खूप चांगली कलाकृती निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल."
कोण आहे नादिया लॅनफ्रेंकॉनी?
नादियाचा जन्म इटलीतील लेक कोमो येथे झाला. इटलीतील मिलान या शहरातून ती लॉस एंजिलिसमध्ये स्थायिक झाली. 2007 मध्ये तिने एक अल्बम रेकॉर्ड केला. या अल्बममधील गाणी तिने लिहिली होती. यानंतर तिने मनोरंजन जगात काम सुरु केले. म्युझिक इव्हेंट होस्ट करण्यासोबतच नादिया मॉडेलिंग आणि अॅक्टिंगसुद्धा करतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नादियाची खास छायाचित्रे...