आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Hollywood Movies Latest News In Divya Marathi

नवीन हॉलिवूडपटांत युवा अभिनेत्रींचा वाढता दबदबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूडमध्ये सध्या नाजूक अभिनेत्रींची चलती आहे. अँक्शनपटात हुकूमशहांना धूळ त्या चारत आहेत. चित्रपटांत महिला अनेक वर्षांपासून यश दाखवत आहेत. मात्र सध्या या रांगेत युवा अभिनेत्री आल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी सर्वाधिक चालणार्‍या 100 चित्रपटांमध्ये अशा एकाही चित्रपटाचा समावेश नव्हता ज्यात कोणी किशोरी जगाला खलनायकापासून वाचवते. गेल्या वर्षी कॅटसीन एव्हरडीनचा चित्रपट ‘द हंगर गेम्स कॅचिंग फायर’ अमेरिकेतील अव्वल क्रमांकाचा चित्रपट राहिला. बॉक्स ऑफीसवर सुपरहीरोचा दबदबा आताही आहे, परंतु फक्त पुरुषांचच चित्रपट यशस्वी होतात, ही खात्री देण्याचे दिवस अता संपले आहेत.
अभिनेत्री बिट्रीस प्रायरचा नवा चित्रपट डायव्हर्जंटला हंगर गेम्ससारखे यश मिळाले नाही. तरी पहिल्या आठवड्यात पाच लाख साठ लाख डॉलरच्या कमाईने मॅट डेमन, टॉम क्रूझचे चित्रपट इलिसियम आणि ओब्लिव्हियन यांना मागे टाकले आहे. व्हेरोनिका रॉथ यांच्या तीन कादंबर्‍यांपैकी एकावर आधारित डायव्हर्जंटची नायिका ट्रीस सिस्टीमविरुद्ध आघाडी उघडते. कादंबरीच्या कथानकावरून वाटते की, यावर चित्रपट बनला असेल तर अंदाधुंद गन चालवणारा हीरो प्रमुख पात्र असेल. आततायी शासकाला धडा शिकवणार्‍या मुलींना हत्यारांचे वावडे नाही.
खलनायकांना आव्हान देणार्‍या मुलींचा जमाना पुढेदेखील चालण्याची शक्यता आहे. दोन हंगर गेम्स चित्रपट आणखी येणार आहेत. डायव्हर्जंटच्या दोन पुस्तकांवर चित्रपट बनतील. मेरी लू यांचे लिजेंड आणि अँली काँडी यांच्या कादंबरीवरही चित्रपट निर्मितीची तयारी सुरू आहे. त्यांतील अभिनेत्री नाजूक सुंदरी असतील.