आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युरासिक वर्ल्ड: डायनासोरच्या आणखी चपळ अॅक्शन, ९०० कोटींचा भव्य चित्रपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डायनासोर या अतिप्राचीन प्राण्याची कल्पना घेऊन स्टीवन स्पिलबर्ग याने साकारलेला ज्युरासिक पार्क हा चित्रपट १९९३ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाची कल्पना त्यावेळी एकदम अफलातून असल्याने संपूर्ण जगासह भारतात या सिनेमाचे जोरदार स्वागत झाले होते.
त्याचे यश आणि प्रतिसाद पाहून या चित्रपाटाचे आणखी तीन भाग निघाले. शिवाय अन्य चित्रपटातही याची आयडिया विविध मार्गाने वापरण्यात आली. आता ज्युरासिक वर्ल्ड हा नवा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. याचे बजेट अंदाजे ९०० कोटी आहे. पहिल्या भागातील डायनासोरपेक्षा यातील डायनासोर अर्थातच चपळ आहेत. त्यामुळे हा सिनेमा एकदा का होईना जरूर पाहावा..
ज्युरासिक पार्क या पहिल्या भागाची जी कथा आहे, त्यातच थोडा फरक करून या सिनेमाची मांडणी करण्यात आली आहे. या पार्कमध्ये अनेक शाकाहारी आणि मांसाहारी डायनासोर असतात. कोस्टारिका येथील या पार्कमधील डायनासोर पाहण्यासाठी जगातून लाखो पर्यटक येत असतात. पण काही चुका होतात आणि भयंकर डायनासोर पिंजऱ्यातून सुटतात. पुढे काय होते हे पडद्यावर पाहणेच योग्य आहे.
मुलांसाठी चित्रपटाची पर्वणी
पूर्वीच्या तुलनेत यात असणारे डायनासोर आणि त्यांची अॅक्शन वेगवान आहे. कारण तंत्रज्ञ फार पुढे गेले आहे. ख्रिस प्राट हा हीरो आहे. ब्राइस डलास ही हिरोइन आहे. तिचे व्यक्तिमत्त्व प्रभावी वाटते. डायनासोरच्या हालचाली आणि त्याच्या चेहऱ्यावरचे खुनशी हावभाव टिपण्यात तंत्रज्ञान यशस्वी ठरले आहे. लहान मुलांना हा चित्रपट निश्चितच आवडेल. शाळा सुरू होण्यापूर्वी ही हॉलीवूडची मस्त भेट समजा.
इरफान खानचा रोल
या चित्रपटात भारतीय अभिनेता इरफान खान एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तो या ज्युरासिक वर्ल्ड पार्कचा मालक असतो. इरफान खानच्या करिअरच्या दृष्टीने ही भूमिका महत्त्वाची आहे. हिंदी भाषेमुळे विना अडथळा संवाद हा चित्रपट सोलापुरात बिग सिनेमा, चित्रमंदिर, प्रभात, कल्पना, लक्ष्मीनारायण या ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित आहे. डी मध्येही आहे. हिंदी भाषेत असल्याने भाषेची अडचण नाही.
बातम्या आणखी आहेत...