आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटोनी फाका दिग्दर्शित 'ओलंपस हॅज फॉलेन' (आतंक का अंत) हा सिनेमा 22 मार्चला जगभरात प्रदर्शित होतोय. गेरार्ड बटलरची प्रमुख भूमिका असलेल्या या अमेरिकन अॅक्शन थ्रिलर सिनेमाचा ट्रेलर युट्यूबवर लाँच झाला आहे. सिनेमात गेरार्ड बटलरबरोबर एरन एकहार्ट, मार्गन फ्रिमॅन आणि अँजेला बेसेट लीड रोलमध्ये आहेत.
सिनेमाची कथा माइक बॅनिंग (गेरार्ड बटलर) या सिक्रेट सर्व्हिस एजंटवर आधारित आहे. हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत तैनात असतो. मात्र एका घटनेनंतर माइकची बदली डेस्क ड्युटीवर करण्यात येते. अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनवर दहशतवादी हल्ल्यात बंधक बनलेल्या राष्ट्राध्यक्षांची तो कशाप्रकारे सुटका करतो याचे चित्रण या सिनेमात करण्यात आले आहे.
हा सिनेमा 120 मिनिटांचा असून 130 मिनियन डॉलरचा खर्च या सिनेमाच्या निर्मितीत आला आहे.
व्हिडिओमध्ये बघा या सिनेमाची खास झलक...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.