आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑप्रा विन्फ्रे सर्वात प्रभावी सेलिब्रिटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - 2013 च्या सर्वात प्रभावी सेलिब्रिटीमध्ये टॉक शो क्वीन ऑप्रा विन्फ्रेची निवड जाहीर झाली आहे. फोर्ब्जच्या नवीन यादीत विन्फ्रेचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

ऑप्रा चा ‘द ऑप्रा विन्फ्रे शो’ टीव्हीवरील कार्यक्रम संपून दोन वर्षे झाली आहेत. परंतु कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार्‍या तिची लोकप्रियता मात्र अजिबात घसरलेली नाही, हेच या पाहणीवरून दिसून येते. ऑप्राने सायकलस्वार लान्स आर्मस्ट्राँग याची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत जगभरातील सुमारे 2 कोटी 80 लाख प्रेक्षकांनी पाहिली होती. तिच्या नंतर लिंकन सिनेमाचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांची लोकप्रियता आहे. स्पीलबर्ग यांच्यानंतर दिग्दर्शक मार्टीन स्कॉर्सिस, रॉन हॉवर्ड, जॉर्ज लुकास यांचा नंबर लागतो.