आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टारबक्ससोबत विन्फ्री विकणार आपल्या नावाच्या ब्रँडचा चहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टीव्ही क्वीन' ओप्रा विन्फ्रीने मासिक आणि टेलिव्हिजन नेटवर्क स्थापित केल्यानंतर आता आपल्या चहाने चाहत्यांना जोडणार आहे. विन्फ्रीने अलीकडेच स्टारबक्स कॉफी कंपनीसोबत एक करार केला आहे.
स्टारबक्स कंपनीच्या आधारे ती टेवेना ओप्रा चहा मार्केटमध्ये आणणार आहे. या चहाचे चार फ्लेव्हर (अद्रक, इलायची, लवंग आणि दालचिनी) बनवले आहेत. विन्फ्री म्हणते, की ती स्वत: चहाची मोठी चाहती आहे.
तिच्या दिवसाची सुरूवात चहानेच होते. विन्फ्रीला स्वादीष्ट आणि मसालेदार चहा आवडतो. ती या चहातून मिळणा-या नफ्यातून तरुणांच्या शिक्षणासाठी मदत करणार आहे. विन्फ्रीची हा चहा लवकरच मार्केटमध्ये येणार आहे.