आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच मॅगझिनच्या कव्हरपेजवर मॉडेलप्रमाणे झळकली ओप्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन क्वीन ओप्रा विन्फ्रे एखाद्या सुपरमॉडेलप्रमाणे आपल्यात मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली आहे. 'ओ' हे ओप्राच्या मालकीचे मॅगझिन असून मे महिन्याच्या अंकाच्या कव्हरपेजवर ती झळकली आहे.
जानेवारीत वयाची साठी पूर्ण करणारी ओप्रा या अंकात आपल्या चाहत्यांना त्वचेसंबंधी टिप्स देताना दिसणार आहे. या अंकाचे नाव तिने 'हाऊ टू लव्ह द स्किन यू आर' असे ठेवले आहे.
वयानुसार बदलत जाणा-या त्वचेची काळजी कशी घ्यावी, याविषयी ओप्राने सांगितले आहे. हा अंक 15 एप्रिलपासून बाजारात उपलब्ध होणार आहे.