आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरल सेक्समुळे या हॉलिवूड अभिनेत्याला झाला होता गळ्याचा कर्करोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - हॉलिवूड अभिनेता मायकल डगलस यांना गळ्याचा कर्करोग झाला होता. ओरल सेक्समुळे त्यांना कर्करोग झाला होता, हे स्वतः त्यांनी कबूल केले आहे. मायकल डगलस यांनी सांगितले की, त्यांनी अनेक स्त्रियांबरोबर ओरल सेक्स केला होता. ऑगस्ट 2010 ते जानेवारी 2011 पर्यंत कर्करोगाशी झूंज दिल्यानंतर 68 वर्षीय मायकल आता सामान्य जीवन जगत आहे.
एका मुलाखतीत मायकल डगलसने सांगितले की, ''काहीतरी गडबड होतेय, याची चाहुल मला लागली होती. कारण माझ्या दातात जखमा झाल्या होत्या. मी अनेकदा कान, नाक आणि गळ्याची तपासणी करुन डॉक्टरांकडून अँटीबायोटिक्स घेतल्या होत्या.''
ह्युमन पेपीलोमा वायरसमुळे गळ्याचा कर्करोग झाल्याचे डगलस यांनी सांगितले. हा वायरस सेक्स करताना पसरतो.
आजार वाढवण्यात स्मोकिंग आणि दारुचे व्यसनही कारणीभूत असल्याचे ते म्हणाले.
हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन जेटा जोंस या मायकलच्या पत्नी आहेत. या आजारपणाच्या काळात पत्नी आणि दोन मुलांनी खूप साथ दिली. कर्करोगाबद्दल कळल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला होता, मात्र नंतर ते या धक्क्यातून सावरले असेही डगलस यांनी सांगितले.
2010 साली जीभेच्या ट्युमरनंतर डगलस कर्करोगावर उपचार घेत होते. मात्र आता ते या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत.