आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर विजेता अभिनेता फिलिप हॉफमॅनचा संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्कर विजेता अभिनेता फिलिप हॉफमॅन याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क येथील अपार्टमेंटमध्ये रविवारी तो मृतावस्थेत अढळला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ काही इंजेक्शन आणि एक पुडी सापडली आहे. ज्यात हेरॉइन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेचा अभिनेता असलेल्या फिलिपच्या मृत्यूची चौकशी करीत असलेल्या तपास अधिका-याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले, की 46 वर्षीय फिलिप हॉफमॅनचा मृत्यू सकाळी 11.15 वाजता झाल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली. त्यानंतर मॅनहॅटन येथील वेस्ट व्हिलेज येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस हॉफमॅनच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेत आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलने हॉफमॅनच्या मृत्यूच्या वृत्ताला दूजोरा दिला आहे. वॉल स्ट्रिटच्या वृत्तात म्हटले आहे, की हॉफमॅन ज्या अपार्टमेंटमध्ये राहात होता तिच्या बाथरूममध्ये तो मृतावस्थेत अढळला आहे. त्याच्या हातात इंजेक्शनही सुई होती. 2005 मध्ये हॉफमॅनला उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला होता. तसेच उत्कृष्ट सहकलाकारासाठी तीन वेळेस त्याचे नामांकन झाले होते.

पुढील स्लाइडमध्ये, फिलिप हॉफमॅनचे गाजलेले चित्रपट