आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OSCAR : \'12 इयर्स अ-स्लेव\' सर्वोत्कृष्ट सिनेमा, \'ग्रॅव्हिटी\'ला सात ऑस्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजेलिस- 86 व्‍या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात '12 इयर्स अ-स्लेव' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला आहे. 'ग्रॅव्हिटी' 'अमेरिकन हसल' आणि '12 इयर्स अ-स्लेव' या तीन सिनेमांमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चुरस दिसून आली.
'12 इयर्स अ-स्लेव' या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बहुमान पटकावला असला तरीदेखील 'ग्रॅव्हिटी'ने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर मोहोर उमटवली आहे. तब्बल सात पुरस्कार 'ग्रॅव्हिटी'ने आपल्या नावी केले. या सिनेमाला एकुण आठ नामांकन मिळाली होती. त्यापैकी सात पुरस्कारांवर ग्रॅव्हिटीने आपले नाव कोरले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटॉग्राफी, व्हिज्युअल इफेक्ट्स, एडिटींग, साऊंड मिक्सिंग आणि सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर या पुरस्कारांवर 'ग्रॅव्हिटी'ने आपले नाव कोरले आहे. अल्फान्सो क्युरॉन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. लॅटीन दिग्दर्शकाने पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार केट ब्लँचेटने आपल्या नावी केला. 'ब्लू जास्मिन' या सिनेमासाठी केटला हा पुरस्कार मिळाला. तर 'डल्लास बायर्स क्लब' या सिेनेमातील भूमिकेसाठी अभिनेता मॅथ्यू मॅककोनाऊगे हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.
लॉस एंजेलिसच्‍या डॉल्‍बी सभागृहात हा सोेहळा रंगला. ऑस्कर 2014ची सुरुवात सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याच्या पुरस्काराने झाली. हा पुरस्कार अभिनेता जेरड लेटोला मिळाला. 'डल्लास बायर्स क्लब' या सिनेमातील भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. अशाप्रकारे 2014चा पहिला ऑस्कर जेरड लेटोला मिळाला. कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला 'ऑस्‍कर -2014 चा केक कापला गेला.
केक सेरेमनीनंतर रेड कार्पेटवर हॉलिवूड स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. 'अमेरिकन हसल'ची अभिनेत्री एमी एडम्स निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. निर्माता हेनी अबू आसदसुध्दा रेड कार्पेटवर दिसले. त्यांच्या 'ओमार' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते. अभिनेता ईथन हाटकेसुध्दा रेड कार्पेटवर दिसला.
हॉलिवूड अभिनेत्री ओलिव्हिया विल्डे गर्भवती आहे. ती देखील रेड कार्पेटवर व्हेलेन्टिनो गाऊनमध्ये दिसली. 'ग्रॅव्हिटी'चे दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉनसुद्धा काळ्या रंगाच्या सुटमध्ये दिसले.
ऑस्‍कर विजेत्‍यांची नावे
सर्वोत्कृष्ट अभिनेता - मॅथ्यू मॅककोनाऊगे (डल्लास बायर्स क्लब)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - केट ब्लँचेट (ब्लू जास्मीन)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अल्फोन्सो क्युरॉन (ग्रॅव्हिटी)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्क्रीनप्ले - स्पाईक जॉन्झ (हर)
सर्वोत्कृष्ट अडप्टेड स्क्रीनप्ले - जॉन रिडले (12 इयर्स अ स्लेव्ह)
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - क्रिस्टन अँडरसन लोपेझ व रॉबर्ट लोपेझ (फ्रोझन)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार - स्टीव्हन प्राइस (ग्रॅव्हिटी)
सर्वोत्कृष्ट चित्रपट संपादन - अल्फोन्सो क्युरॉन व मार्क सँगर (ग्रॅव्हिटी)
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - इम्युनेल लुबेझ्की (ग्रॅव्हिटी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लुपिटा न्याँग (12 इयर्स अ स्लेव्ह)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - जेअर्ड लेटो (डल्लास बायर्स क्लब)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम डिझायनर - कॅथरीन मार्टिन (द ग्रेट गॅट्स्बी)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा पुरस्कार - अद्रुइथा ली व रॉबीन मॅथ्यू (डल्लास बायर्स क्लब)
सर्वोत्कृष्ट अॅनिमिटेड लघुपट - मि. हबलॉट (लॉरेन्ट विट्झ आणि अलेक्झांडर एस्पिगेअर्स)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - फ्रोझन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ग्रॅव्हिटी
सर्वोत्कृष्ट लघुपट (लाइव्ह अॅक्शन) - हेलिअमबेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट - द लेडी इन नंबर 6: म्युझिक सेव्ह्ड माय लाईफ
बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - द ग्रेट ब्युटी (इटली)
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा ऑस्कर 2014 सोहळ्याची खास छायाचित्रे...