आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Oscar Award News In Marathi, Gravity Film, Los Angeles

‘ग्रॅव्हिटी’च्या गुरुत्वाकर्षणाने खेचले 7 ऑस्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजिलिस - 86 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात विज्ञानकथेवर आधारीत ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटाने सात पुरस्कार जिंकले. ‘12 इयर्स अ स्लेव्ह’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. ‘डलास वायर्स क्लब’ या चित्रपटासाठी मॅथ्यू मॅककॉनेघीला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर ‘ब्ल्यू जॅस्मिन’साठी केट ब्लँचेटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. केटने ‘ब्ल्यू जॅस्मिन’मध्ये धनाढ्य महिलेची भूमिका साकारली. ‘डलास वायर्स क्लब’मध्ये मॅककॉनेघीने औषधी चोरून रुग्णांची सेवा करणा-या एका एड्सग्रस्त व्यक्तीची भूमिका साकारली.


ऑस्करचे मानकरी : ०ग्रॅव्हिटी : अल्फान्सो कुआरॉन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ०12 इयर्स अ स्लेव : लुपिटा न्योंग सर्वाेत्कृष्ट सहअभिनेत्री ०डलास बायर्स क्लब : जॅरेड लेटो सर्वाेत्कृष्ट सहअभिनेता ०बेस्ट सिनेमॅटोग्राफी : अ‍ॅम्मानुएल लुबेझ्की
3. बेस्ट फिल्म एडीटींग (अल्फान्सो कुआरॉन आणि मार्क सँगर). 4.बेस्ट ओरिजनल स्कोर (स्टीव्हन प्राइस).5.बेस्ट साऊंड एडिटींग (ग्लेन फ्रीमेंटल). 6. बेस्ट साऊंड मिक्सिंग (क्रिस्प लिव्हसे, निव्ह एडिरी, क्रिस्तोफर बेनस्टीड, ख्रिस मुनरो). 7. बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स (टिमोथी वेबर, ख्रिस लॉरेन्स, डेव्हिड शिर्क, नील कोरबोल्ड)


अन्य पुरस्कार विजेते
अ‍ॅनिमेटेड फिल्म । फ्रोजन : प्रवासाला निघालेल्या साहसी राजकुमारीची कथा.
फीचर डॉक्युमेंट्री : 20 फीट फ्रॉम स्टारडम : 20 व्या शतकातील गायकांच्या जीवनावरील माहितीपट.
फॉरेन लँग्वेज फिल्म : द ग्रेट ब्यूटी, इटली ० अ‍ॅडॉप्टेड स्क्रीनप्ले : जॉन रिडली (12 इयर्स अ स्लेव्ह)
० मेकअप / हेअरस्टायलिंग : अदरुइता ली, रॉबिन मॅथ्यूज (डलास बायर्स क्लब)
० ओरिजनल साँग : क्रिस्टेन अँडरसन : लोपेझ आणि रॉबर्ट लोपेझ (गीत- लेट इट गो. चित्रपट- फ्रोझन) ० ओरिजनल स्क्रीनप्ले : स्पाइक जॉन्झे (हर) ० अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : मिस्टर हुबलोट ० लाइव्ह-अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म : हिलीयम ० शॉर्ट डॉक्युमेंट्री : द लेडी इन नंबर 6 - म्युझिक सेव्हड माय लाइफ : जगातील सर्वात वयोवृद्ध पियानोवादक अ‍ॅलिस हर्झ सोमर (109 वर्षे) यांच्या जीवनावरील माहितीपट.नॅशनल न्यूजरूम