आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर विजेते रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांचे निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्कर विजेते ब्रिटन सिनेमा दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. यशस्वी दिग्दर्शक होण्यापूर्वी ते ब्रिटनचे दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते.
सहा दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी वर्ल्ड वार दोनच्या युध्दावरील बंदीवर बनवलेला 'द ग्रेट एस्केप' आणि डायनासोरवर बनलेला 'जुरासिक पार्क' या दोन थ्रिलर सिनेमांत त्यांनी अभिनेता म्हणून काम केले होते.
एक दिग्दर्शक म्हणून त्यांना 'गांधी' सिनेमासाठी ओळखले जाते. या सिनेमासाठी त्यांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.

बीबीसीचे कला संपादक विल गोमपेडर्ज यांनी सांगितले, रिचर्ड अ‍ॅटेनबरो अनेक वर्षे पतीसोबत एका नर्सिग होममध्ये राहिले.
सहा वर्षांपूर्वी पाय-यांवरून तोल जाऊन खाली पडल्याने ते व्हिलचेअरवर होते. त्यांच्या मुलाने बीबीसीला सांगितले, की रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांचे रविवारी (24 ऑगस्ट) दुपारी दुपारी निधन झाले. त्यांचे कुटुंबीय याविषयी नंतर माहिती देणार आहे.
रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांना श्रध्दांजली देण्यासाठी ब्रिटनचे प्रधानमंत्री डेव्हिड कॅमरून यांनी टि्वट केले, 'ब्राइटन रॉकमध्ये त्यांचा अभिनय उत्कृष्ट होता. त्यांनी गांधीच्या पात्राला न्याय दिला होता. सिनेसृष्टीत रिचर्ड यांचे मोठे योगदान राहिले आहे.'