आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • OSCAR PICS: See The Stars On The Red Carpet Looks

OSCAR PICS: पाहा रेड कार्पेटवरील स्टार्सचे लुक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजिलिसमध्ये 3 मार्च रोजी 86 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. या अवॉर्ड सोहळ्यात नेहमीप्रमाणे ग्लॅमरस हॉलिवूड तारे-तारकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
अल्फान्सो क्युरॉन दिग्दर्शित गॅव्हिटी या सिनेमाने तब्बल सात ऑस्कर आपल्या नावी केले.
ऑस्कर 2014 या सोहळ्याची सुरुवात केक कापून झाली. त्यानंतर रेड कार्पेटवर हॉलिवूड स्टार्सचा जलवा बघायला मिळाला. 'अमेरिकन हसल'ची अभिनेत्री एमी एडम्स निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. निर्माता हेनी अबू आसदसुध्दा रेड कार्पेटवर दिसले. अभिनेता ईथन हाटकेसुध्दा रेड कार्पेटवर दिसला.
हॉलिवूड अभिनेत्री ओलिव्हिया विल्डे गर्भवती आहे. ती देखील रेड कार्पेटवर व्हेलेन्टिनो गाऊनमध्ये दिसली. 'ग्रॅव्हिटी'चे दिग्दर्शक अल्फान्सो क्युरॉनसुद्धा काळ्या रंगाच्या सुटमध्ये रेड कार्पेटवर अवतरले होते. या सगळ्यांसह हॉलिवूडमधील अनेक स्टार कपल्स यांनीही रेड कार्पेटची शोभा वाढवली. यामध्ये हॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडीच्या अर्थातच ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांच्या हजेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ऑस्कर 2014च्या रेड कार्पेटवर क्लिक झालेली हॉलिवूड स्टार्सची खास छायाचित्रे...