आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात बघा कशी झाली पॉल यांच्या गाडीची अवस्था, मनमिळाऊ स्वभावाचे होते पॉल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता 'फास्‍ट अँड फ्युरियस' चित्रपटांतील नायक पॉल वॉकर (वय 40) यांचा दक्षिण कॅलिफोर्नियातील सँटा क्‍लॅरिटा येथे कार अपघातात मृत्‍यू झाला. पॉल त्‍यांच्‍या मित्राबरोबर एका चॅरिटी शोसाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात त्‍यांचा मित्रही ठार झाला.

चाळीस वर्षीय वॉकर यांची कार अतिशय वेगात होती. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता, की कारच्या ठिक-या उडाल्या. अपघातानंतरचे दृष्य ह्रदय हेलावून सोडणारे होते.

'मॉन्सटर इन द क्लॉजेट' नावाच्या कॉमेडी चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या पॉल यांना 'वर्सिटी ब्ल्यूज'मुळे प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर ते 'ब्रायन ऑकॉनर' या नावाने प्रसिद्ध झाले होते. 'फास्‍ट अँड फ्युरियस' या चित्रपटात पॉल यांचे हेच नाव होते.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला भीषण कार अपघातानंतर पॉल वॉकर यांच्या गाडीची घेण्यात आलेली छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून हा अपघात किती भीषण असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकाल. याशिवाय पॉल वॉकर यांच्या खासगी आयुष्यातील काही खास छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. पॉल खासगी आयुष्यात मनमिळाऊ स्वभावाचे होते.