आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीनच्या आडून हिरोईनचा रेप, डायरेक्टरच्या Plan विषयी नव्हते काहीही माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास्ट टँगो इन पॅरिसच्या रेप सीनमध्ये मार्लोन ब्रँडो आणि मारिया श्नायडर. - Divya Marathi
लास्ट टँगो इन पॅरिसच्या रेप सीनमध्ये मार्लोन ब्रँडो आणि मारिया श्नायडर.
लॉस एंजल्स - 1972 मध्ये प्रदर्शित झालेला 'लास्ट टँगो इन पॅरिस' हा चित्रपट अचानक वादात अडकला आहे. या वादाचे कारण म्हणजे या चित्रपटात दाखवण्यात आलेला रेप सीन. चित्रपटाचे डायरेक्टर बर्नार्डो बेर्तोलुची ( Bernardo Bertolucc) यांनी नुकतेच एका मुलाखतीत मान्य केले की, त्यांनी चित्रपटातील रेप सीन लीड अॅक्ट्रेस मारिया श्नायडर हीच्या मर्जीच्या विरोधात शूट केला होता. सीन अधिक रियालिस्टीक बनवण्यासाठी तसे करावे लागल्याचे डायरेक्टर म्हणाले.

मारियाला वाटले, जणू खरंच रेप झाला..
बेर्तोलुची यांच्या मते, त्यांनी अॅक्टर मार्लोन ब्रांडोबरोबर हा सीन डिस्कस केला होता. पण त्यांनी याबाबत मारियाला काहीही कल्पना दिलेली नव्हती. एवढेच नाही, तर बेर्तोलुची यांच्या मते सीनची आयडिया अत्यंत भयंकर होती. पण त्यांना याबाबत काहीही पश्चाताप नाही. 2007 मध्ये एका मुलाखतीत मारियाने तिचा खरंच रेप झाला नव्हता असे स्वीकारले होते. पण मी स्वतःला रेप व्हिक्टीमच समजत होते असे सांगितले होते. हा सीन ओरिजनल स्क्रीप्टमध्ये नव्हता. ही मार्लोनची आयडिया होती. आम्ही सीन शूट करायला गेलो तेव्हा त्याने मला सांगितले. मला रागही आला होता.

मारिया म्हणाली की, मी एजंट किंवा लॉयरला बोलवायला हवे होते. कारण जे स्क्रीप्टमध्ये नसेल ते तुम्ही बळजबरी करून घेऊ शकत नाही. पण त्यावेळी मला हे माहिती नव्हते. मला फार अपमानित भावना येत होती. खरं सांगायचे तर बेर्तोलुची आणि मार्लोन दोघांनी मिळून माझा बलात्कार केला. सीननंतरही त्यांनी मला धीरही दिला नाही किंवा माझी माफीही मागितली नाही. सीन एक टेकमध्ये झाला हे तरी बरे.

लोकांचा संताप..
बेर्तोलुची यांनी केलेल्या खुलाश्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. लोक ट्वीटरवर त्यांच्या विरोधात राग व्यक्त करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही बेर्तोलुची यांच्यावर टीका केली आहे. अॅक्ट्रेस जेसिका चास्तेन (Jessica Chastain) ने ट्वीटरवर लिहिले की, हा चित्रपट पाहणारे सगळे 48 वर्षीय व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीवर केलेला रेप पाहतात. अॅक्टर ख्रिस इव्हानने लिहिले आहे की, त्यांना सोडले का हेच समजत नाही. त्यांनी तुरुंगात असायला हवे होते.

2011 मध्ये मारियाचे निधन
'लास्ट टैंगो इन पॅरिस' एका अशा व्यक्तीची कथा आहे जो पत्नीच्या सुसाइडनंतर पुन्हा एक अफेयर करतो. सर्वात वादग्रस्त चित्रपटांपैकी एक हा चित्रपट आहे. चित्रपटात रियल सेक्स आणि रेप दाखवल्याने लोकांना हा चित्रपट आल्यानंतर धक्का बसला होता. मारियाने चित्रपटात जीन नावाच्या तरुणीची भूमिका केली होती. त्यावेळी ती 19 वर्षांची होती. 3 फेब्रुवारी 2011 ला कँसरमुळे तिचा मृत्यू झाला होता. 2004 मध्ये मार्लोनचाही मृत्यू झाला.

पुढे पाहा, 'लास्ट टँगो इन पॅरिस'मधील मारिया आणि मार्लोनचे काही सीन्स..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...